वार्षिक सर्वसाधारण सभा
   
 

स. न. वि. वि.

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची सन २०१३-२०१४ ची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २०-७-२०१४ रोजी सकाळी ठिक १०.०० वा. भारतीय क्रीडा मंदिर. वडाळा, मुंबई - ४०००३१ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व संलग्न संस्थेच्या प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित रहावे. ही विनंती.

सभेपुढील विषय :

१. मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तांत वाचून मंजूर करणे.

२. इतर औपचारिक (अभिनंदन, श्रध्दांजली वगैरे) ठराव मंजूर करणे.

३. सन २०१३-२०१४ च्या वार्षिक अहवालास मंजुरी देणे.

४. सन २०१३-२०१४ चा वार्षिक जमाखर्च व ताळेबंद मंजूर करणे.

५. सन २०१३-२०१५ सालाकरिता लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व त्यांचे मानधन निश्चित करुन ते मंजूर करणे.

६. सन २०१४-२०१५ चे अंदाज पत्रक मंजूर करणे.

७. सन २०१४-२०१९ मुंबई शहर कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक.