कबड्डी .... हा मराठमोळ्या महाराष्ट्राचा लोकप्रिय खेळ! जनमान्यतेबरोबरच राजमान्यता लाभलेल्या या कबड्डी खेळाने देशाचीच नव्हे, तर आशिया खंडाची वेश ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. हा खेळ एकाच सूरात (दमात) व एकाच नियमाने सर्वत्र खेळला जावा याकरिता भारतीय हौशी संघटनेची स्थापना होऊन आज जवळ जवळ सहा तपे होत आली. हे सर्व करण्यात व कबड्डीचा प्रचार व प्रसार करण्यास महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीच नाकारु शकणार नाही. |