- कबड्डी – कबड्डी दम सुस्पष्ट घेत नसेल तर पंचाने परत पाठ्वून विरुध्द संघास एक तांत्रिक गुण देवुन चढाईची संधी द्यावी. परंतु अशा परिस्थितीत त्या खेळाडूचा पाठलाग करता येणार नाही. (खेळाचे नियम : ५)
- दम उशिरा घेण्यास सुरुवात केल्यास (प्रतिपक्षाच्या अंगणात स्पर्श केल्यानंतर) पंच अथवा सरपंचाने त्यास परत बोलावून विरुध्द संघास एक तांत्रिक गुण देवून चढाईची संधी द्यावी. (खेळाचे नियम : ६)
- आपली पाळी नसताना एखादा खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस गेला तर पंच अथवा सरपंचाने त्यास परत बोलावून विरुध्द संघास एक तांत्रिक गुण देवून चढाईची संधी द्यावी. (खेळाचे नियम : ७)
- एकाच वेळी जर एकाहुन अधिक खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस गेले तर पंच अथवा सरपंचाने त्यास परत बोलावून विरुध्द संघास एक तांत्रिक गुण देवून चढाईची संधी द्यावी. (खेळाचे नियम : ८)
- चढाई करणार्याची चढाई संपल्यास अथवा बाद झाल्यानंतर लागलीच दुसर्या संघाने आपला खेळाडू ५ सेकंदाच्या आत चढाईस पाठवावा. न पाठविल्यास त्या संघाची पाळी संपल्याचे जाहीर करुन विरुध्द संघास एक तांत्रिक गुण देवून चढाई करणेस सांगावे. (खेळाचे नियम : ९)
- लोण पडल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी आपापल्या अंगणात १० सेकंदात प्रवेश करावा अन्यथा पंच अथवा सरपंचाने प्रतिपक्षास एक तांत्रिक गुण जाहीर करावा. त्यानंतरही एखादा संघ सरपंच सुचना करुनही एक मिनिटाच्या आत आपल्या अंगणात आला नाही तर त्या संघास त्या सामन्यापुरता बाद करुन विरुध्द संघ जिंकल्याचे जाहीर करावे. (खेळाचे नियम : १६)
- चढाई करणारा प्रतिपक्षाच्या अंगणात चढाई करीत असताना त्याला त्याच्या संघातील खेळाडूंनी अन्य प्रकारे सुचित केल्यास पंच अथवा सरपंचाने विरुध्द संघास एक तांत्रिक गुण द्यावा. (खेळाचे नियम : १७)
- चढाई करणार्यास जाणुनबूजुन त्याचे कपडे अथवा केस धरुन पकड केल्यास चढाई करणार्यास बाद न देता बचाव पक्षाच्या खेळाडूस बाद द्यावे. (खेळाचे नियम : १८)
- तृटीत काळात खेळाडूंना आपले अंगण सोडून जाता येत नाही. जे खेळाडू या नियमाचे उल्लंघन करतील त्या संघाविरुध्द एक तांत्रिक गुण जाहीर करावा. (सामन्यांचे नियम : ४ ब)
- खालील नमुद केलेल्या कबड्डी खेळाला व क्रिडावृत्तीला विशोभित असलेल्या कृत्यांबद्दल सरपंच अथवा पंच आपल्या अधिकारात ताकीद देणे, गुण जाहीर करणे, तात्पुरते अथवा त्या सामन्यापुरते अथवा स्पर्धेतून खेळाडू अथवा संघ निलंबित करु शकतात.
१. सरपंच अथवा पंच यांच्याबाबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असभ्य उदगार काढणे.
२. निकालाबाबत सामनाधिकार्यांना वारंवार विचारणे.
३. चढाई अथवा बचाव करणार्याने बोट दाखवून निर्णयाची मागणी करणे.
४. चढाई करणार्याचा दम कोणत्याही मार्गाने बंद करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शरीरास दुखापत करण्याचा प्रयत्न केल्यास.
५. कैचीच्या साहाय्याने चढाई करणार्याची पकड केल्यास.
६. कोणत्याही प्रशिक्षक किंवा खेळाडूने बाहेरुन सुचना दिल्यास.
७. चढाई करणाराची चढाईची पाळी असता त्यास प्रतिबंध केल्यास.