अखिल भारतीय कबड्डी संघटनेकडून आलेल्या कबड्डीच्या नवीन नियमांची अंमलबजावणी यापुढील होणार्‍या स्पर्धांपासुन होणार आहे. त्याप्रमाणे अखिल भारतीय कबड्डी संघटनेकडून आलेल्या नवीन मुळ इंग्रजी पुस्तकातील सुधारीत ठळक नियमांची माहिती खाली दिली आहे.

क्रिडांगणः

  • पुरुष व कुमार मुले – १३ x १० मीटर

( पुरुष – ८० किलो वजन / कुमार मुले – ६५ किलो वजन व वय २० वर्षे )

  • महिला व कुमारी मुली – १२ x ८ मीटर

( महिला – ७०  किलो वजन / कुमारी मुली – ६० किलो वजन व वय २० वर्षे )

  • किशोर मुले व किशोरी मुली – ११ x ८ मीटर

( किशोर मुले-५० किलो वजन व वय १६ वर्षे /किशोरी मुली-५० किलो वजन व वय १६ वर्षे )

  • प्रत्येक संघात कमीत कमी १० खेळाडू व जास्तीत जास्त १२ खेळाडू असतील. एका वेळेस ७ खेळाडू क्रीडांगणात खेळावयास उतरतील व उरलेले खेळाडू राखीव म्हणुन राहतील.
  • तृटीत काळ सरपंचाच्या परवानगीने खेळाच्या मध्यंतराअगोदर २ व मध्यंतरानंतर २ वेळा घेता येतो. तृटीत काळ मर्यादा ३० सेकंदापेक्षा जास्त नसते. तृटीत काळात सरपंचाच्या परवानगीने खेळाडू बदलता येतात.
  • खेळाडू जखमी झाल्यास पंच किंवा सरपंच अधिकृत तृटीत काळ (खेळाडूंच्या भाषेत मेडिकल टाईम आउट) घेवु शकतात. परंतु या तृटीत काळात खेळाडू बदलता येत नाही.