संघटनेचा इतिहास
सुरवातीला निव्वळ हौस म्हणून खेळ्ले जाणारे खेळ परंतू कालांतराने प्रत्येक खेळांच्या संघटना निर्माण झाल्यानंतर त्या संघटनेच्या अखत्यारीत स्पर्धा होत होत्या. १९३५ साली मुंबई शरिरीक शिक्षण मंडळाची स्थापना झाली. त्याच वेळी त्या वेळ्च्या हुतूतू महासमिती कामकाज पहात होती. व तीच्या अखत्यारीत मुंबईच्या हुतूतूच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या १९५६ सली मुंबई जिल्हा हुतूतू फेदरेशन व मुंबई शारिरीक शिक्षण मंडळ यांचे एकीकरण झाले आशा तर्हेने सर्व विविध खेळांच्या विविध संघटना मुंबई शारिरीक शिक्षण मंडळ या मध्यवर्ती संघटनेत समील झाल्यानंतर त्या वेळच्या सर्व स्पर्धा म्हणजे कुस्ती, हुतूतू, लेझीम, खो-खो, आट्या-पट्या, मल्लखांब, ३ सर्व स्पर्धा मुंबई शारिरीक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली संबंधीत खेळाच्या संघटना घेत होत्या.
१९५६-५७ सली मुंबई जिल्हा हुतूतू फेडरेशनची रीतसर निवडणूका होवून या संघटनेच्या अध्यक्ष पदाची धूरा कै. एस. एस. प्रभू यांच्यावर सोपविण्यात आली व सह कार्यवाह म्हणून श्री. बी. पी. माने, श्री. आबासाहेब नाईक यांना ही जबाबदारी सस्विकारली आशा तर्हेने १९६० पर्यंत त्यांनी यशस्वीरित्या ही जबाबदरी पार पाडल्यानंतर पुढच्या त्रैवषिक निवडणूकानंतर ही जबाबदारी मा. श्री. किसनराव सकपाळ अध्यक्ष व सह कार्यवाहक म्हणून श्री. विठ्ठल वाणी व श्री. रामदास कांदळ्गांवकर संयुक्त कार्यवाहक यांनी हा पदभार स्विकारला आशा तर्हेने १९६४ पर्यंत मुंबई जिल्हा हुतूतू फेडरेशनच्या अधिपत्याखाली हुतूतू स्पर्धा होत होत्या व त्यातुनच मुंबई जिल्ह्याच्या पुरुष/महिला प्रतिनिधीक संघची निवड केली जात होती व याच काळात मुंबई हुतूतू संघाने श्री. राजाराम पवार, परशूराम पटील, मधू पटील, वसंत ढवन, वसंत सूद, अनंत गंभीर, या सारखे दिग्गज खेळाडू महाराष्ट्र संघाला दिले एवढेच नव्हे तर १९५९ ते १९६४ या कळावधीत मुंबईचे कप्तान पद सातत्याने भूषविणारे राजाराम पवार यांनी महाराष्ट्राच्या प्रतिनिधीक संघाचे सतत ३ वर्षे नेतृत्व करुन महाराष्ट्राला हॅट्रीक संपादून दिली. राजाराम पवार, मधू पटील, वसंत सूद, शेखर शेट्टी, वसंत ढवण यांनी आपल्या खेळाचा ठसा राष्ट्रीय स्पर्धेवर उमटवला नतंर आखिल भारतीय स्तरावर या खेळात सुसुमता यावी देशातील सर्व राज्य या देशी खेळांच्या प्रगतीच्या द्रुष्टीने पुढे तरी एका अधिपत्याखाली आणून आखिल भारतीय स्तरावर या खेळाचे आयोजन होणे परिहार्य आहे हे लक्षात घेऊन अनेक दिग्गज मंडळींच्या प्रयत्नाने अखिल भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनची स्थापना होऊन या खेळासाठी सर्वानुमते कबड्डी हा दम स्विकारला व १९६४-१९६५ ला मुंबई जिल्हा हुतूतू फेडरेशनचे मुंबई जिल्हा असोसिएशनचे नामकरण झाले.
मुंबईच्या कुलाबाच्या दांडी पासुन बोरीवली व मुलुंड पर्यंतचे जवळ जवळ १२०० संस्था मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशनला संलग्न होत्या त्या वेळी एवढया मोठया जिल्ह्याची धुरा सर्वश्री एस. एस. प्रभू , राजाराम कांदळगांवकर, आबा नाईक, दिनकर करले, भ. स. घाग, कै. कृष्णा पाटील, भाऊराव वेलवलकर, नारायण जळवी, कै. पालेकर, गणपत वालझाडे, पांडुरंग परब, एस. आर शिंदे, कै. बाबा चैदवणकर, कै. ज्ञानेश्वर वाणी, सखाराम पवार, बी. टी. जगताप, राजाराम नार्वेकर पाटील, आर. आर. मुणगेकर, एम. डी. चव्हाण. सन १९६३ ते १९७३-७४ साला पर्यंत अध्यक्ष म्हणून श्री एस. एस. प्रभू होते काही काळ श्री. वासुदेव पाटील, संयुक्त कार्यवाहक होते काही काळ दौलत आयरे, विठ्ठल लाड, ह. म. दामले, कै. पांडूरंग राम आरौदेकर, मनोहर भोळे, दत्ता कदम, अनंत लोके, विश्राम बागवे, जयवंत चव्हाण, वसंत थळे, गणेश कोंडवळकर आणि इतर ह्या सर्वांनी जबाबदारी स्विकारली होती.
१९७५-७६ साली शासनाच्या एक खेळ एक फेडरेशन या तत्वानुसार प्रत्येक खेळाच्या वेगवेगळ्या संघटना अस्तित्वात येऊन मुंबई शारिरीक मंडळातुन मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पहीले अध्यक्ष म्हणून रामभाऊ कांदळगांवकर व प्रमुख कर्यंवाह म्हणून श्री. आबा नाईक, चंद्रचसेन राजे शिर्के, अनंत लोके यांनी कामकाज पहिले नंतर १९८२ साली शासनाच्या शासकिय कामकाजाच्या दृष्टीने मुंबई जिल्ह्याचे मुंबई शहर व मुंबई उपनगर असे दोन विभाग करण्यात आले व त्याचा परिणाम क्रिडा विभागावर होऊन मुंबई जिल्हा असोसिएशनचे ही दोन विभाग होऊन मुंबई शहर असोसिएशन व मुंबई जिल्हा असोसिएशन अशा जिल्ह्याच्या दोन संघटना उदयास आल्या.
१९८७ साली पंचवार्षिक निवड्णूकी नंतर सर्वश्री रामभाऊ कांदळगांवकर, कार्याअध्यक्ष राजाराम पवार, प्रमुख कर्यंवाह चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनची यशस्वी वाटचाल सुरु झाली व त्याचे फलीत म्हणून १९९१ साली मुंबई शहर असोसिएशनच्या यजमानपदाखाली व मा. ना. छगनराव भुजबळ यांच्या सहकार्याने ९ वी किशोर व ४० वी पुरुष / महिला राज्य अजिंक्य पद चाचणी स्पर्धेचे दिमाखदार व देखणे आयोजन केले जावून ती स्पर्धा यशस्वी केली गेली परंतू याच वेळी १९९१ साली प्रमुख कर्यंवाह चंद्रकांत दळवी यांचे अपघाती निधन झाले. हा अपघत सहन करीत असताच ११-१२-१९९३ रोजी अध्यक्ष कै. रामभाऊ कांदळगांवकर व खजीनदार कै. श्री. दुलाजी राणे यांच्या निधनाने असोसिएशनवर मोठाच अघात झाला परंतू याही परिस्थितीत सर्वश्री आबासाहेब नाईक (अध्यक्ष), राजाराम पवार (कार्याअध्यक्ष) अनंत घाग, पांडुरंग परब, वसंत थळे, मारुतीराव जाधव, भगवानराव घाग, किसनराव सकपाळ, मिनानाथ धनाजी, प्रभाकर अमृते, मनोहर इंदुलकर इ. मान्यवर खंद्या कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम पूर्वक असोसिएशनचा दोलारा समर्थपणे सांभळला.
१९९४ रोजीच्या पंचवार्षिक निवडणुकीतून वयोपरोलेत असोसिएशनचा कार्यभार ज्यांनी आतापर्यंत साभाळण्यास ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते असोसिएशनचे अध्यक्ष श्री. आबासाहेब नाईक हे जबाबदारीतून मुक्त होवून नव्या-जुन्या कार्यंकर्त्यांच्या खांद्यावर असोसिएशनची धुरा टकली. आता श्री. उदयदादा लाड (अध्यक्ष), राजाराम पवार (कार्याअध्यक्ष), श्री. मारुतीराव जाधव, भ. स. घाग, सिताराम राणे (कार्याअध्यक्ष), श्री. मिनानाथ धानाजी (प्रमुख कार्यवाहक), श्री. प्रभाकर अमृते, मनोहर इंदुलकर (सहकार्यवाहक) व खजीनदार श्री. दिगंबर शिरवाडकर हे कार्यकरणीचे पदाधिकारी समर्थपणे कामकाज पाहिले.
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन ही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कबड्डी खेळामधील एकमेव संघटना असेल ती आपल्या संघटनेच्या घटनेनुसार प्रतिवर्षी आपल्या जमा-खर्चाचे हिशेब व वार्षिक अहवाल संलग्न संस्थांना वेळेवर सादर करून जुलैच्या दुसर्या आठवडया पर्यंत वार्षीक सर्वसाधारण सभा होते एवढेच नव्हे तर घटनेनुसार प्रती पाच वर्षानी निर्धारीत वेळेत आपल्या पंचवार्षीक निवडणुका प्रक्रिया पार पाडते. संलग्न संस्थांना एक प्रतिनिधी म्हणुन मतदान करण्याकरिता नोंदवावा लागतो त्याची मतदार यादी तयार केली जाते याच मतदार यदीतील व्याक्तीस मतदान करण्याचा व निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहण्यास अधिकार त्याला प्राप्त असतो. निवडुन आलेल्या पंचवीस सदस्याची निवड करण्यात येते. संघटनेचे विद्यामान अध्यक्ष मा. आ. भाई जगताप, श्री. मोहन राठोड (आय. पी. एस) (उपाध्यक्ष), श्री. शिवकुमार लाड (उपाध्यक्ष), श्री. मारुतीराव जाधव (कार्याध्यक्ष), श्री. कृष्णा तोडणकर (कार्योपाध्याक्ष), श्री. मनोहर इंदुलकर (प्रमुख कार्यवाहक), श्री. प्रभाकर अमृते (स. कार्यवाह), श्री. विश्वास मोरे (स. कार्यवाह), श्री. दिगंबर शिरवाडकर (खजिनदार) श्री. सदानंद भोसले, कार्यकारिणी सदस्य :- सर्वश्री संजय शेटे, शरद कालंगण, भरत मुळे, राजेश पाडावे, दिपक मसुरकर, रामचंद्र जाधव, आनंदा शिंदे, संजय सुर्यवंशी, राजेश शिवतरकर, सुधीर देशमुख, चंद्रशेखर राणे, दिनेश पाटील, पराग सुर्वे, नितीन तरडेकर, अंकुश पाताडे, महेंद्र हळदणकर, राजेंद्र आधटराव, दगडू वलावंडे, अनिल केशव, शुभांगी पुजारी हे सर्व सदस्य संघटनेचे कामकाज यशस्वी पणे सांभाळत आहेत.
आज जिल्हा संघटनेकडे खेळाडुं कल्याण निधी असून हा जास्तीत जास्त जमविण्याचा निर्धार असून या निधीचा विनियोग स्पर्धेत दुखापत झालेल्या खेळाडूंसाठी केला जातो तसेच पंच कार्यकर्ते यांना त्यांच्या नाजुक परिस्थितीत या निधीतून मदत केली जाते.
खेळाडू विकास निधी हा होतकरु उदयन्मुख खेळाडूंसाठी तसेच जिल्ह्याच्या प्रतिनिधी संघात निवड झालेल्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबीरे घेणे, पंच मार्गदर्शन शिबीर, प्रशिक्षेकांसाठी प्रशिक्षण शिबीर व असोसिएशनचे क्रीडा विषयक उपक्रम राबविण्यासाठी वापरला जातो.
संघटनेला आजामेती जवळ जवळ ४५० संस्था संलग्न असुन त्यांच्या श्रेणीनुसार गटवारी करण्यात येते स्थानिक संघात प्रथम, द्वीतीय व तृतीय श्रेणी महिला तसेच कुमार/कुमारी, किशोर/किशोरी आशा ११ विभगात विभागणी करण्यात आली आहे. प्रतिवर्षी सहा खेळाडू यांची रितसर नोंद प्रत्येक खेळाडूला ओळ्खपत्र देण्यात येते.
संघटनेची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा प्रती वर्षी दिवाळीपूर्वी घेतली जाते. विविध आकरा गटात या स्पर्धा घेतल्या जावून त्यातूनच मुंबई शहर किशोर/किशोरी, कुमार/कुमारी, पुरुष व महिला संघाचा खेळाडूंची निवड केली जाते.
मुंबई पुरुष संघाने आता पर्यंत २१ वेळा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम विजेतेपद संपादन केले तर महिला संघने ११ वेळा विजेतेपद मिळ्विले त्यात दोन वेळा अजिंक्यपदाची हॅट्रीक साधली आहे.