• नाणेफेकी जिंकणार्‍या संघास अंगण अथवा चढाई यापैकी एकाची निवड करण्याचा अधिकार राहिल व हरणार्‍यास अंगण व चढाई यातून राहिलेल्या एकाची निवड करता येईल. परंतु दुसर्‍या डावाची सुरुवात ज्या संघाने प्रथम चढाई केली नसेल त्या संघास चढाई द्यावी.
    (खेळाचे नियम : १)
  • पाच-पाच चढायांच्या वेळी ज्या संघाने प्रथम चढाई केली असेल त्याच संघास या वेळी पहिली चढाई द्यावी.
    (सामन्यांचे नियम : ८-१०)
  • सुवर्ण चढाई करीता नव्याने नाणेफेक करुन जो संघ नाणेफेक जिंकेल त्या संघास सुवर्ण चढाई द्यावी.